Joshua 21

1मग लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराणाचे मुख्य त्यांच्याजवळ आले. 2ते कनान देशांतील शिलो येथे येईन म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या व्दारे अशी आज्ञा दिली होती की आम्हास राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांचे गायराने द्यावी.

3यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांस दिली.

4तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठी निघाली लेव्यांतला अहरोन याजकाच्या वंशजास यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली. 5कहाथीच्या राहिलेल्या वंशजास एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळातून व दानाच्या वंशांतून व मनश्शेच्या अर्ध्या वंशातून दहा नगरे चिठ्या टाकून मिळाली.

6आणि गेर्षोनाच्या वंशजास इस्साखार वंशांतील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानांत मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्या टाकून मिळाली. 7मरारीच्या वंशजास त्यांच्या कुळांप्रमाणे, रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून, बारा नगरे मिळाली.

8परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्या टाकून ही नगरे आणि यांचे गायराने लेव्यांस दिले 9त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत, 10लेवी वंशातील कहाथीच्या कुळांतल्या अहरोनाच्या वंशजासाठी ही नगरे होती कारण पहिली चिठी त्यांची निघाली.

11त्यास त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्या पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, हे आणि त्याचे चहुकडले गायराने त्यांना दिले. 12परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.

13त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजास हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायराने दिले, आणि लिब्ना व त्याचे गायराने; 14आणि यत्तीर व त्याचे गायराने, आणि एष्टमोवा व त्याचे गायराने; 15होलोन व त्याचे गायराने आणि दबीर व त्याचे गायराने; 16अईन व त्याचे गायराने, आणि युट्टा व त्याचे गायराने, बेथ-शेमेश व तिचे गायराने; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;

17बन्यामीन वंशांतले गिबोन व त्याचे गायराने; गेबा व त्याचे गायराने; 18अनाथोथ व त्याचे गायराने, आणि अलमोन व त्याचे गायराने, अशी चार नगरे दिली. 19अहरोन वंशातील याजकास त्यांची तेरा नगरे व त्याचे गायराने मिळाली.

20राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांस एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठी टाकून नगरे दिली. 21त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यास दिले; आणि गेजेर व त्याचे गायराने; 22किबसाईम व त्याचे गायराने; आणि बेथ-होरोन तिचे गायराने अशी एकंदर चार नगरे दिले;

23दानाच्या वंशांतून एलतके व त्याचे गायराने, गिब्बथोन व त्याचे गायराने; 24अयालोन व त्याचे गायराने, गथ रिम्मोन व त्यांचे गायराने अशी चार नगरे दिली;

25मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ रिम्मोन त्यांचे गायराने, अशी दोन नगरे दिली; 26बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजास एकंदर दहा नगरे व त्यांचे गायराने दिली.

27लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळास मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायराने, आणि बैश्तरा व त्यांचे गायराने, अशी दोन नगरे दिली;

28इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायराने, दाबरथ व त्याचे गायराने; 29यर्मूथ व त्याचे गायराने, एन-गन्नीम व त्याचे गायराने, अशी चार नगरे दिली; 30आणि आशेराच्या वंशांतली मिशाल व त्यांचे गायराने, अब्दोन व त्यांचे गायराने, 31हेलकथ व त्यांचे गायराने, आणि रहोब व त्यांचे गायराने, अशी चार नगरे दिली;

32नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायराने, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायराने, आणि कार्तान व त्यांचे गायराने, अशी तीन नगरे दिली. 33गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्याचे गायराने,

34आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळास जबुलूनाच्या वंशांतले यकनाम व त्याचे गायराने, कर्ता व त्याचे गायराने; 35दिम्रा व त्याचे गायराने, नहलाल व त्याचे गायराने, अशी चार नगरे दिली;

36आणि रऊबेन वंशांतले बेजेर व त्यांचे गायराने, आणि याहस व त्यांचे गायराने; 37कदेमोथ व त्यांचे गायराने, आणि मेफाथ व त्यांचे गायराने, अशी चार नगरे दिली; 38आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादांतले रामोथ व त्यांचे गायराने, महनाइम व त्यांचे गायराने

39हेशबोन व त्याचे गायराने, याजेर व त्यांचे गायराने, सर्व चार नगरे दिली. 40लेव्यांच्या कुळांतली राहिलेली मरारीची वंशज त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्या टाकून त्यांना दिली.

41इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांस एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासहित दिली. 42ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांस होते.

43याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलांस जो देश त्यांच्या पूर्वजांस देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यांत राहिले. 44याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहुकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले. परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्यास जी काही चांगले सांगितले होते, त्यातली एकही गोष्ट पूर्ण झाल्यावाचून राहिली नाही; सर्व घडून आले.

45

Copyright information for MarULB